मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

बिकिनी किलरची कथा: चार्ल्स शोभराजचा ‘अदृश्य’ चेहरा

भाग 1

बिकिनी किलरची  कथा: चार्ल्स शोभराजचा ‘अदृश्य’ चेहरा

काही लोक जन्मतःच नियम तोडण्यासाठी जन्माला येतात. त्यांच्यासाठी कायदा फक्त एक पर्याय असतो आणि तुरुंग? तो तर त्यांचं दुसरं घरच असतं. असाच एक माणूस होता, जो जिथे जाईल तिथे दहशत घेऊन जाई. अर्धा व्हिएतनामी, अर्धा भारतीय, पण पूर्णपणे धोकादायक आणि चतुर. भारताची असो वा थायलंडची, नेपाळची असो वा ग्रीसची, सर्व पोलिस त्याच्या मागावर होते. पण त्याला पकडणं इतकं सोपं नव्हतं. ज्याला सगळं जग पळपुटा समजत होतं, त्यानेच तुरुंगात बसून आपल्या बायोपिकसाठी 5 मिलियन डॉलरचा हॉलिवूड करार केला.  विचार करा, इतर कैदी जेवणासाठी रांगेत उभे असताना, हा आपली वाढदिवस पार्टी साजरी करत असे. अधिकारीही त्याच्या इशाऱ्यावर चालत. जणू तुरुंग नव्हता, तर त्याचा खासगी व्हिला होता. कधी स्वतःला उद्योजक म्हणवायचा, कधी डिप्लोमॅट बनून विमानतळ ओलांडायचा, आणि जेव्हा लोकांना त्याचा खरा चेहरा कळायचा, तेव्हा तो पुढच्या शहरात नवी कहाणी लिहीत असे. तो देखणा होता, हुशार होता, आणि त्याचा आत्मविश्वास असा होता की जणू सगळं जग त्याच्यावर फिदा होतं. पण त्याच्या आत लपलेला राक्षस जेंव्हा बाहेर यायचा,तेंव्हा तो लोकांना आपल्या बोलण्यात गुंतवून हळूहळू विष पाजायचा. तो एक सिरियल किलर होता. पण असा, जो प्रत्येक खून सिनेमाच्या स्टाईलने करायचा. त्याचे बळी बहुतेक मुली असायच्या आणि जेव्हा तो त्यांची हत्या करायचा, तेव्हा एका विचित्र सनकेतून त्यांच्या मृतदेहाला फक्त बिकिनीमध्येच सोडायचा. याच कारणामुळे जगभराने त्याला एक नाव दिलं - बिकिनी किलर.

आता वेळ आहे त्या माणसाची कहाणी जाणून घेण्याची, जो तुरुंग तोडण्यात मास्टर होता आणि खोटं बोलण्यात जागतिक दर्जाचा. त्याचं नाव होतं चार्ल्स शोभराज. कोणत्याही मुलाने कधी असं स्वप्न पाहिलं नसेल की तो मोठा होऊन जगातील सर्वात कुख्यात सिरियल किलर बनेल. पण जर एक मूल प्रेम, आपुलकी आणि आपलेपणाशिवाय मोठं होत असेल, तर त्याच्या मनात जी पोकळी निर्माण होते, तीच पुढे जाऊन जगासाठी सर्वात मोठा धोका बनते. चार्ल्स शोभराजची कहाणी अशीच आहे.

6 एप्रिल 1944 रोजी व्हिएतनामच्या सायगॉन शहरात चार्ल्सचा जन्म झाला. त्याचे वडील, शोभराज हॅचर्ड बावानी, एक भारतीय उद्योजक होते, तर आई, ट्रॉन लनफुंग, व्हिएतनामी होती. त्यांचं नातं चार्ल्सच्या जन्मापूर्वीच तुटलं होतं आणि त्याच्या जन्मानंतर ती दरी आणखी खोल झाली. काही वर्षांतच त्याचे आई-वडील वेगळे झाले. त्याच्या आईने फ्रेंच लष्करातील लेफ्टनंट अल्फन्स डॅरियोशी दुसरं लग्न केलं आणि चार्ल्सला घेऊन ती फ्रान्समधील मार्सेल शहरात गेली. तिथे नव्या वडिलांनी त्याला घर दिलं, पण आपुलकी कधीच दिली नाही. डॅरियोने त्याला दत्तक घेतलं, पण आपलं नाव कधीच दिलं नाही. चार्ल्स त्या घरात पाहुण्यासारखा होता, ज्याला रोज हे जाणवत होतं की तो या कुटुंबाचा भाग नाही. शाळेतही त्याची अवस्था वेगळी नव्हती.  मिश्र वंशामुळे फ्रेंच मुलं त्याच्यापासून अंतर ठेवायची. मैत्री तर दूरची गोष्ट होती. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तो एकटा बसायचा. वर्गात अनेकदा गैरहजर राहायचा, आणि रस्तेच त्याचं खरं जग बनलं. त्याचं डोकं तीक्ष्ण होतं, पण हृदय आतून पोकळ होतं. जणू सगळं असूनही काहीच नव्हतं. आणि हीच पोकळी हळूहळू त्याच्या आत विषासारखी भरत गेली.

एके दिवशी कोणीतरी त्याला विचारलं, "तू किती खून केलेस?" तो हसला आणि म्हणाला, "20, 100, कदाचित 50 पेक्षा जास्त. कोण मोजतं?" हीच होती चार्ल्सची खरी विचारसरणी - थंड, क्रूर, आणि निर्दयी. त्याला खऱ्या वडिलांची कमतरता सर्वात जास्त जाणवायची, ज्यांनी त्याला जन्म देऊन तात्काळ सोडून दिलं. त्यांच्यासाठी त्याने आपल्या डायरीत लिहिलं होतं, "मी तुला नक्कीच पश्चात्ताप करायला लावेन की तू कधीच पित्याचं कर्तव्य पार पाडलं नाहीस." हे शब्द रागात लिहिले असले, तरी ही ओळ त्याच्या आयुष्याची वास्तविकता बनली.

वेळ निघत गेली आणि चार्ल्स आपल्या कुटुंबापासून आणि समाजापासून अधिकच दूर गेला. तो घरी थांबत नव्हता, शाळेत टिकत नव्हता, आणि एक दिवस त्याची पाऊले त्याला थेट गुन्हेगारीच्या जगात घेऊन गेली. त्याने तो मार्ग निवडला जिथे प्रेम नव्हतं, विश्वास नव्हता, फक्त खेळ होता - लोकांच्या भावनांशी, त्यांच्या जीवाशी. चार्ल्स शोभराजने दाखवून दिलं की जेव्हा एक मूल फक्त रक्ताने जोडलेलं असतं, पण नात्याने नाही, तेव्हा तो मोठा होऊन माणूस नव्हे, तर एक धोकादायक कहाणी बनतो.

वयाच्या सुरुवातीला, जेव्हा इतर मुलं शाळा आणि खेळात व्यस्त असायची, तेव्हा चार्ल्सने गुन्हेगारीचा मार्ग पत्करला. सुरुवातीला तो छोट्या-मोठ्या चोऱ्या करायचा. लोकांना फसवून त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन सगळं घेऊन पसार व्हायचा. त्याची सर्वात मोठी ताकद होती त्याचं व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता. मिश्र वंशामुळे तो वेगळा दिसायचा आणि याच वैशिष्ट्याचा फायदा घेऊन तो कोणत्याही संस्कृतीत सहज मिसळायचा. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी, व्हिएतनामी अशा भाषा तो सहज बोलायचा आणि इतक्या चतुराईने संभाषण करायचा की समोरच्याला तो त्याचा जवळचा मित्र वाटायचा. लोकांचे चेहरेवाचन त्याला अवगत होतं आणि त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांना फसवणं हा त्याचा खेळ बनला होता.


1963 मध्ये, वयाच्या 19 व्या वर्षी, तो पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर दागिन्यांच्या चोरीचा आरोप होता. त्याला पॅरिसमधील तुरुंगात टाकण्यात आलं. पण तुरुंगही त्याच्यासाठी शाळेसारखं होतं. तिथेही त्याने लोकांच्या मनाशी खेळणं सोडलं नाही. त्याने स्वतःला एक निष्पाप, हतबल व्यक्ती म्हणून सादर केलं, जणू काही परिस्थितीमुळे तो गुन्हेगार बनला. त्याची ही अभिनयाची कला इतकी जबरदस्त होती की तुरुंगातील अधिकारीही त्याच्याशी सहानुभूती दाखवायला लागले. जिथे इतर कैद्यांना कठोर शिक्षा मिळायची, तिथे चार्ल्सला नेहमी सौम्य वागणूक मिळायची.

याच तुरुंगात त्याची भेट फेलिक्स डी'एस्कोने याच्याशी झाली. फेलिक्स हा एक श्रीमंत आणि फ्रेंच तरुण होता, जो दर आठवड्याला कैद्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी तुरुंगात यायचा. चार्ल्सने हळूहळू फेलिक्सला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि काही भेटींमध्येच त्यांच्यात गहरी मैत्री झाली. जेव्हा चार्ल्स तुरुंगातून सुटला, तेव्हा तो थेट फेलिक्सच्या घरी गेला. आता तो दोन वेगळ्या जगात जगत होता - एक फेलिक्सचं उच्चभ्रू आणि सभ्य जग, जिथे तो उच्चवर्गीय लोकांशी भेटायचा आणि समाजसेवेचा दिखावा करायचा; आणि दुसरं त्याचं खरं जग, जिथे खोटारडेपणा, चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारी हाच त्याचा खरा चेहरा होता.

या दुहेरी खेळादरम्यान, एका पार्टीत त्याची भेट शेनल कंपॅनियन नावाच्या सुंदर पॅरिसियन मुलीशी झाली. शेनल एक एअर होस्टेस होती - स्मार्ट, स्वतंत्र आणि ग्लॅमरस. चार्ल्सचं व्यक्तिमत्त्व आणि त्याचं रहस्यमयी आकर्षण शेनलला खूप आवडलं. त्यांची मैत्री अधिक गहिरी झाली आणि काही काळातच ती प्रेमात बदलली. चार्ल्स आता शेनलला लग्नासाठी प्रपोज करू इच्छित होता. पण प्रश्न हा होता की, जी मुलगी त्याच्या बाह्य व्यक्तिमतवाने इतकी प्रभावीत झाली होती, ती त्याच्या आत लपलेलं धोकादायक सत्य जाणू शकेल का?

भाग 2 उद्या सकाळी 10 वाजता 

टिप्पण्या