मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

अमेझॉन रिव्ह्यू किलर: एक थरारक सत्यकथा

अमेझॉन रिव्हिव्ह किलर

अमेझॉन रिव्ह्यू किलर: एक थरारक सत्यकथा

आज आपण एका अशा भयभीत करणाऱ्या कथेचा उलगडा करणार आहोत, जी एका सिरीयल किलरभोवती फिरते. हा किलर आपल्या कृत्यांनी पोलिसांना वर्षानुवर्षे गोंधळात पाडतो आणि जेव्हा तो शेवटी तुरुंगात जातो, तेव्हा त्याला वाटतं की त्याचे खरे गुन्हे पोलिसांना कधीच कळले नाहीत. त्यामुळेच तुरुंगातून तो एका वृत्तपत्राशी संपर्क साधतो आणि घोषणा करतो, "मला माझी संपूर्ण कहाणी सांगायची आहे. मी जे खून केले, त्यापैकी अनेकांची पोलिसांना कल्पनाच नाही."

वृत्तपत्राने त्याची कहाणी छापली आणि त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपचा तपास सुरू केला. हा तपास एका धक्कादायक सत्याकडे घेऊन गेला, ज्यामुळे या किलरला 'अमेझॉन रिव्ह्यू किलर' असे नाव मिळाले. हे नाव का पडले? कारण त्याने आपले सर्व क्रूर गुन्हे करण्यासाठी लागणारी साधने अमेझॉनवरून विकत घेतली होती आणि प्रत्येक साधनाचा रिव्ह्यू आपल्या अमेझॉन अकाऊंटवर लिहिला होता! त्यात तो त्या साधनाचा वापर करून केलेल्या गुन्ह्याचे तपशील आणि ते साधन किती 'उत्तम', 'उपयुक्त' किंवा 'वाईट' आहे, याबद्दलची मते नोंदवत असे.

टॉड कोल्हॉप: गुन्हेगारीचा प्रवास

अमेझॉन रिव्हिव्ह किलर
बंदिस्त मुलगी
ही कथा १९७० च्या दशकातील अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातून सुरू होते. टॉड कोल्हॉप नावाचा एक मुलगा, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच गुन्हेगारीच्या खाईत लोटला गेला. त्याने एका मुलीचे अपहरण केले, तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या धाडसी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि टॉडला अटक झाली. त्याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगात असताना त्याने संगणक विज्ञानात (कम्प्युटर सायन्स) पदवी मिळवली, जे भविष्यात त्याच्या गुन्हेगारीला एक वेगळेच वळण देणारे होते.

२००० च्या सुमारास टॉड तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगाबाहेर आल्यावर त्याने काही काळ भटकंती केली. सुरुवातीला त्याने ग्राफिक्स आर्टिस्ट म्हणून काम केले, पण लवकरच ते सोडून तो रिअल इस्टेट एजंट बनला. त्याने रिअल इस्टेटचा परवाना मिळवला, काही मालमत्ता विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि एक छोटा गटही तयार केला. पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते. हा रिअल इस्टेटचा व्यवसाय त्याने केवळ आपले घृणास्पद गुन्हे लपवण्यासाठी एक मुखवटा म्हणून वापरला.

पहिला मोठा गुन्हा आणि १२ वर्षांची शांतता

२००३ मध्ये दक्षिण कॅरोलिनामध्ये एक भयानक घटना घडली. एका मोटरसायकलच्या दुकानातून एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि सांगितले की तिथे चार मृतदेह पडले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना खरोखरच चार मृतदेह आढळले. सर्वांना गोळ्या घालून निर्दयपणे मारण्यात आले होते. पोलिसांनी कसून तपास केला, पण खुनीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ही घटना २००३ ची असून, पोलिसांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. अखेरीस ती फाइल बंद करण्यात आली आणि पुढील १२ वर्षे या गुन्ह्याचा तपास थंडावला.

२०१५: पोलिसांना महत्त्वाचा सुगावा

२०१५ मध्ये एका कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली की त्यांची मैत्रीण आणि तिचा नवविवाहित पती बेपत्ता झाले आहेत. त्यांचे फोन बंद होते आणि त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या महिलेच्या मोबाईलच्या लोकेशनवरून एका निर्जन ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांना ती महिला साखळ्यांनी बांधलेली आढळली, भीतीने थरथर कापत होती. पोलिसांनी तिला सोडवले आणि तिच्याशी बोलले. तिने सांगितले की, तिच्या डोळ्यांदेखत तिच्या पतीला गोळी मारण्यात आले आणि तिला त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आले.

अमेझॉन रिव्हिव्ह किलर
बंदिस्त मुलगी 
ज्या मालमत्तेत ती महिला सापडली, ती टॉड कोल्हॉपच्या नावावर होती. पोलिसांनी तात्काळ टॉडचा रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला! तो यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात १५ वर्षे तुरुंगात होता. पोलिसांनी टॉडला शोधून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्या महिलेच्या पतीचा मृतदेह तिथे आढळला. आता हा दुहेरी खुनाचा गुन्हा होता आणि पोलिसांना खात्री पटली की टॉड यामागे आहे.

पोलिसांनी टॉडच्या लॅपटॉपवर तपास सुरू केला आणि त्यांना एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. टॉडचे अमेझॉनवर स्वतःचे अकाऊंट होते. त्याने तिथून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या रिव्ह्यू सेक्शनकडे पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. टॉडने खून करण्यासाठी वापरलेल्या प्रत्येक साधनाचा रिव्ह्यू लिहिला होता!

अमेझॉन रिव्ह्यू किलरचा पर्दाफाश

टॉड तुरुंगात असताना त्याने स्थानिक वृत्तपत्र 'हेराल्ड'शी संपर्क साधला आणि सांगितले, "मी सात खून, दोन अपहरणं आणि एक बलात्कार केला आहे. मला माझी संपूर्ण कहाणी जगासमोर सांगायची आहे." वृत्तपत्राने त्याची ही धक्कादायक कहाणी छापली.

पोलिसांनी पुन्हा त्याच्या अमेझॉन रिव्ह्यूजचा तपास केला आणि त्याची वृत्तपत्राला सांगितलेली कहाणी यांच्याशी जुळवली. त्यातून एक विचित्र आणि भयानक सत्य समोर आले. टॉड प्रत्येक खुनानंतर, त्या खुनासाठी वापरलेल्या साधनांचा रिव्ह्यू अत्यंत थंड डोक्याने लिहायचा.

उदाहरणांसाठी काही रिव्ह्यूज असे होते

फावड्याचा रिव्ह्यू: त्याने एका खुनानंतर मृतदेह जमिनीत पुरला होता. त्यासाठी वापरलेल्या फावड्याचा रिव्ह्यू त्याने लिहिला, “हे फावडं खूप उपयुक्त आहे. गाडीत ठेवायला सोपं आहे. जर तुम्हाला अचानक खड्डा खणायचा असेल, तर हे फावडं पटकन काम करतं आणि मृतदेह लपवायला कमी वेळ लागतो.”

चाकूचा रिव्ह्यू: त्याने एका चाकूबद्दल लिहिले, “मी याचा वापर अजून कोणाला मारण्यासाठी केला नाही, पण हा चाकू पाहिल्यावर वाटतं की याने खून करणं सोपं आणि योग्य होईल.”

साखळीचा रिव्ह्यू: त्याने एका व्यक्तीला साखळीने बांधले होते. त्याबद्दल त्याने लिहिले, “ही साखळी आणि तिचं कुलूप इतकं मजबूत आहे की, समोरच्याला एकटं सोडलं तरी तो उघडताना म्हातारा होईल, पण कुलूप उघडू शकणार नाही.”

कटरचा रिव्ह्यू: “हे कटर सोबत ठेवायला सोपं आहे आणि कापण्यातही उपयुक्त आहे.”

त्याने वापरलेल्या प्रत्येक साधनाला रेटिंग दिली होती आणि त्यासोबत क्रूरतेने आपले अनुभव लिहिले होते. जेव्हा ही सर्व माहिती पोलिसांसमोर आली आणि त्याची वृत्तपत्राला सांगितलेली कहाणी या रिव्ह्यूजशी पूर्णपणे जुळली, तेव्हा एक अत्यंत मजबूत खटला तयार झाला. कोर्टाने त्याला सात जन्मठेपेची शिक्षा सुनावली, ज्यात त्याला एकदाही पॅरोल मिळणार नाही असे स्पष्ट केले. याचा अर्थ, तो कधीच तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही.

अमेझॉन रिव्हिव्ह किलर
हाच तो टॉड कोल्हॉप

आजही टॉड कोल्हॉप अमेरिकेतील तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे. त्याच्या या भयानक कथेवर एक ओटीटी मालिका देखील बनली आहे, ज्याचं नाव आहे ‘अमेझॉन रिव्ह्यू किलर’. हा जगातील पहिला असा खुनी होता, ज्याने केवळ खूनच केले नाहीत, तर खुनासाठी वापरलेल्या प्रत्येक साधनाचा रिव्ह्यू लिहून आपल्या विकृत भावना व्यक्त केल्या.


टिप्पण्या