मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

रशियन स्लीप एक्सपेरिमेंट: झोपेच्या पलीकडचे रहस्य

 


रशियन स्लीप
एक्सपेरिमेंट: झोपेच्या पलीकडचे रहस्य

तुम्ही कधी विचार केलाय का, की माणूस झोप न घेता किती काळ जिवंत राहू शकतो? डोळ्यांखाली काळी वर्तुळं, थकलेलं शरीर, आणि हरवलेलं मन... पण जर हा थकवा मर्यादेपलीकडे गेला तर? आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, जी तुमच्या रात्रीच्या झोपेची शांतता हिरावून घेईल. ही आहे रशियन स्लीप एक्सपेरिमेंट ची कथा – एक भयानक, रहस्यमयी आणि वादग्रस्त गोष्ट, जी खरी आहे की खोटी, याचा आजही उलगडा झालेला नाही

युद्धाच्या सावलीत जन्मलेला प्रयोग.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात असे बरेच अनधिकृत प्रयोग झाले ज्यांची चाचणी जिवंत मानवी शरीरावर घेतली गेली.ज्यात जिवंत मानवी शरीरावर प्रयोग करून निष्कर्ष काढले जात. दुसऱ्या महायुद्धात हिटलर चा डॉक्टर जोसेफ मेंगेलें च्या ज्या कथा नंतर बाहेर आल्या त्या हदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री-पुरुष सर्वांवर त्याने खूप विचत्र आणि भयानक प्रयोग त्याच्या प्रयोगशाळेत केले ज्यात भूल न देता शरीर फाडून हृदय कसं काम करत हे पाहणं असो वा इतर प्रयोग . असे खूप सारे प्रयोग त्याने ज्यू लोकांवर केले कारण ज्यू लोकांना तिथे फक्त मारण्यासाठीच आणलं जात असे मग ते मरण कसंही असो.1930 ते 1945 च्या दरम्यान जपान ने चीन च्या बऱ्याच मोठया जमिनीवर आक्रमन करून तेथील स्थानिक लोकांना बंदी बनवलं. आणि असेच अघोरी प्रयोग जपान ने पण चीन च्या लोकांवर केले. युद्धात हार झाली म्हणून अमेरिकेला शरण गेल्यानंतर  UNIT 731 LAB जी कागतपत्रे बाहेर आली त्यात कसं जपानी सैनिकांनी फिंगफोंग जिल्ह्यात एक प्रयोगशाळा स्थापन करून चीन च्या लोकांवर कसे अत्याचार केले आणि कसे प्रयोग केले याची सविस्तर नोंद होती .शिरो इशी नावाचा जपानी या युनिटचा प्रमुख होता. याला इतिहासातील भयंकर अशी टॉर्चर लॅब (torture lab in history) म्हणूनही ओळखलं जातं. हा झाला इतर विषय पण आता आपण पाहणार आहोत रशियन स्लिप एकस्पिरिमेंट 

१९४० चं दशक. दुसरं महायुद्ध आपल्या चरमसीमेवर होतं. रशियाच्या 

 गूढ खोलीत बंदिस्त आयुष्य


या प्रयोगासाठी एक खास खोली तयार करण्यात आली  एक एअरटाइट चेंबर, ज्याच्या काचेच्या भिंतींमधून बाहेरचे शास्त्रज्ञ बंद्यांवर लक्ष ठेवू शकत होते, पण बंदी बाहेरचं काही पाहू शकत नव्हते. खोलीत खाण्यापिण्याच्या वस्तू, शौचालय, आणि पाण्याची व्यवस्था होती. विशेष म्हणजे, एक रहस्यमयी वायू या खोलीत सोडण्यात येत असे , जो झोप येण्यास प्रतिबंध करत होता. पण सोबतच ऑक्सिजनची पुरेशी मात्रा पण दिली जात होती, जेणेकरून बंदी श्वास घेऊ शकतील.त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मायक्रोफोन आणि कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक शब्द आणि हालचाल टिपली जात होती

पहिले दोन दिवस अगदी सामान्य गेले. बंदी हसत-खेळत, एकमेकांशी गप्पा मारत होते. “३० दिवस कसे निघून जातील,” असं त्यांना वाटत होतं. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाला थकवा जाणवू लागला. त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागली, आणि बोलण्यात थोडी आळस जाणवत होती. पण तरीही, सर्व काही नियंत्रणात होतं... किंवा त्यांना तसं वाटत होतं.

पाचवा दिवस: अंधाराची सुरुवात

पाचव्या दिवसापासून खोलीतलं वातावरण बदललं. बंदींचं बोलणं बडबडण्यात बदललं. ते एकमेकांशी बोलत होते, पण प्रत्येकजण स्वतःच्याच विश्वात हरवलेला होता. एक बोलत होता, दुसरा बडबडत होता, आणि तिसरा काहीतरी बरळत होता. कोण कोणाचं ऐकत होतं, याची त्यांना पर्वा नव्हती. शास्त्रज्ञांना वाटलं, की कदाचित झोपेच्या कमतरतेमुळे त्यांचं मन भटकू लागलं आहे. पण हा तर फक्त अंधाराचा पहिला पडदा होता.

सहाव्या आणि सातव्या दिवसाला त्यांची अवस्था आणखी बिकट झाली. त्यांचे चेहरे निस्तेज झाले, डोळे खोल गेले, आणि हालचाली मंदावल्या. ते बोलत होते, पण त्यांचे शब्द अर्थहीन होते. शास्त्रज्ञ चिंतेत पडले, पण लष्करी कमांडरने प्रयोग थांबवण्यास नकार दिला.


 नववा दिवस: किंचाळनारा राक्षस

नवव्या दिवसाला एक भयानक घटना घडली. पाच बंद्यांपैकी एकाने अचानक जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका तीव्र होता, की बाहेर बसलेल्या शास्त्रज्ञांना त्यांचे कान बंद करावे लागले. तो सलग तीन तास ओरडत किंचाळत राहिला, खोलीत धावत राहिला, आणि हे सर्व करत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतर चार बंद्यांवर याचा काहीच परिणाम झाला नाही. ते आपल्याच बडबडीत मग्न होते, जणू काही त्याच्या ओरडण्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं.तीन तासांनंतर त्याचा आवाज बंद झाला.

का? कारण त्याचे घशाचे स्नायू फाटले होते. तो बोलू शकत नव्हता, पण त्याचे डोळे अजूनही जागे होते, आणि त्यात एक भयानक चमक होती.


पंधरावा दिवस: मानवतेचा अंत

दहाव्या दिवसानंतर खोलीतलं वातावरण इतकं गंभीर झालं, की शास्त्रज्ञांना वाटलं की कदाचित बंदी मरून गेले असावेत. पण ऑक्सिजनचा वापर पाहता, ते जिवंत असल्याचं स्पष्ट होतं. तेराव्या दिवसाला शास्त्रज्ञांनी प्रयोग थांबवण्याचा विचार केला, पण कमांडरने त्यांना रोखलं. “हा प्रयोग पूर्ण झालाच पाहिजे,” असं त्याचं म्हणणं होतं.

पंधराव्या दिवसाला शास्त्रज्ञांनी खोलीत संदेश पाठवला: “आम्ही खोली उघडणार आहोत. दारापासून दूर राहा, नाहीतर गोळी मारली जाईल.” पण बंद्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सर्वांचे पायाखालची जमीन सरकली. “आम्हाला मुक्ती नको. आम्हाला इथेच राहायचं आहे,” असं ते म्हणाले. त्यांचा आवाज इतका थंड आणि अमानवीय होता, की शास्त्रज्ञांचा थरकाप उडाला.


जेव्हा शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी खोलीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी पाहिलेलं दृश्य त्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारं होतं. छतावर रक्ताचे डाग, भिंतींवर रक्ताचे डाग  हातांच्या नखाने जमिनीवर,भिंतीवर केलेले मोठ मोठे व्रण,आणि बंद्यांनी स्वतःचं मांस खाल्ल्याच्या खुणा. काही बंद्यांचे अवयव निखळले होते, जसे की कोणाचा डोळा नव्हता तर कोणाचं नाक नव्हतं तर कोणाचा कान.आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता होती. शास्त्रज्ञांनी ती विशेष वायू बंद केली, पण यामुळे एका बंद्याचा मृत्यू झाला. बाकी चार जणांचं वर्तन इतकं भयानक झालं होतं, की त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहणं कठीणच होतं.

प्रयोगाचा भयावह अंत

शास्त्रज्ञांनी प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला, पण कमांडरने याला विरोध केला. त्याने एका शास्त्रज्ञाला बंद्यांसोबत खोलीत राहण्याचा आदेश दिला. यामुळे घाबरलेल्या एका शास्त्रज्ञाने कमांडरलाच गोळी मारली. बाकी चार बंद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, पण त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. शेवटचा राहिलेला बंदी पुन्हा खोलीत ठेवण्यात आला. सतराव्या दिवसाला, जेव्हा शास्त्रज्ञाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या बोलण्यात माणसाचा आत्मा हरवलेला होता. तो बोलत असताना एक माणूस बोलतोय असं वाटतच नव्हतं.त्याच्या डोळ्यांत एक अंधार होता, ज्याने शास्त्रज्ञाला हादरवलं.


शेवटी, शास्त्रज्ञाने त्या शेवटच्या बंद्याला गोळी मारली, आणि हा भयानक प्रयोग संपला. पण त्याने मागे सोडलं, एक प्रश्न – माणूस खरंच झोप न घेता जिवंत राहू शकतो का? की झोपेच्या पलीकडे फक्त अंधार आणि वेड आहे?

 खरी की खोटी?

ही कथा 2009 मध्ये Creepypasta Wiki वर प्रथम प्रकाशित झाली, एक काल्पनिक भयकथा म्हणून. रशियाने या प्रयोगाचा स्पष्ट इन्कार केला आहे, आणि याला समर्थन देणारे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, झोप न घेण्याचे गंभीर परिणाम होतात – मतभ्रंम, चिडचिड, आणि शारीरिक कमजोरी. पण कथेतील अतिशयोक्तीपूर्ण वर्णन, जसे स्वतःचं मांस खाणं, वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासार्ह वाटत नाही.

तरीही, ही कथा इंटरनेटवर वायरल झाली. यावर चित्रपट, पुस्तकं आणि गेम्स बनले. काहींना वाटतं, की ही फक्त एक अतिरंजित गोष्ट आहे. तर काहींना वाटतं, की यात काहीतरी सत्य आहे, कारण दुसऱ्या महायुद्धात असे अनेक अनैतिक प्रयोग झाले.

झोपेचं रहस्य

ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते – झोप ही माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती आपलं शरीर आणि मन ताजं ठेवते. पण जर ती हिरावली गेली, तर काय होऊ शकतं? रशियन स्लीप एक्सपेरिमेंट ही खरी असो वा खोटी, ती आपल्याला आपल्या मर्यादांबद्दल विचार करायला भाग पाडते.

तुम्हाला काय वाटतं? ही कथा खरी आहे, की फक्त एक भयानक स्वप्न? तुम्ही किती काळ झोप न घेता जागे राहू शकता? खाली तुमचे विचार कमेंट्समध्ये सांगा, आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

या  प्रयोगत जो शेवटचा बंदी होता त्याचा  फोटो  google वर तुम्ही rashiyan sleep experiment images असं सर्च करून पाहू शकता 

टिप्पण्या